वरील एका प्रतिसादात हिंदीतील भास्कर व अन्य वर्तमानपत्रात इंग्रजीचा वापर कमीत कमी केला जातो असे मत मांडले आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून मी इंदूरमध्ये आहे. येथील सर्व वर्तमानपत्रे मी सध्या आवर्जून वाचतो आहे. भास्करसहित सर्व वर्तमानपत्रात इंग्रजीचा बेसुमार वापर केला जात आहे. एवढा इंग्रजीचा वापर मराठी वर्तमानपत्रेही करत नाही, मी हे अतिशय जबाबदारीने लिहितो आहे. भास्करमध्ये तर सर्वांत जास्त इंग्रजी वापरले जाते. तुलनेने नई दुनिया या वर्तमानपत्रात इंग्रजीचा वापर कमी आहे. हे वर्तमानपत्र आपल्याकडील सकाळसारखे स्वतःची काही सामाजिक जबाबदारी आहे, असे मानून प्रसिद्ध केले जाते. त्यामुळे भास्करसारखी सवंग पत्रकारिता त्यात आढळत नाही. इंग्रजीचा अनावश्यक वापर ही समस्या आपल्यापुरतीच मर्यादित नाही. ती हिंदीतही आहे, हे स्पष्ट करणाऱ्या   wahmedia.blogspot.com  या ब्लॉगला आवर्जून भेट द्या.