प्रश्नमंजुषा चांगली जमली आहे. खूप पुलंच्या चाहत्यांना वाटते (माझ्यासकट), की आपल्याला पुलंचे साहीत्य तोंडपाठ आहे. आपण कदाचित कंसात मुळ लेखाचे नाव दिले नसते, तर प्रश्नमंजुषा अजुन कठीण झाली असती. मला जमलेली काही उत्तरे.
४. अजून गुणांची टक्केवारी कळली नाही. कळल्यावर सांगेन. पण निदान पासष्ट प्रतिशत तरी मिळावेत. [व्यक्ती आणि वल्ली]
५. "बापूशेठ, पाव्हणे लेखक आहेत हो. आमच्या आबा शेठ सारखी नाटकं लिहिलं आहेत. फार बोलू नका. नाहीतर तुमच्यावर लिहितील एखादा फर्मास फार्सं." [व्यक्ती आणि वल्ली]
६. मी निमूटपणाने सगळ्यांना घेऊन बाहेर गेलो. त्यांची तहान भागवली. शंकऱ्याला रासबेरीची तहान लागली होती. शरीला ऑरेंजची. [असा मी असामी]
८. कृष्ण चालले वैकुंठाला। राधा विनवी पकडुनि बाही। इथे तमाखु खाऊनि घे रे। तिथे कन्हैय्या तमाखु नाही॥ [पानवाला]