प्रभाकरपंत,

माझ्या कृतीमध्ये सोडा किंवा ईनोज घालण्याचा उल्लेखहि नाही.  त्यामुळे ती शक्यता मी लक्षात घेतली नाही.  प्रतिभाताईंच्या प्रतिसादात तसा उल्लेख नव्हता.  आपण ते निर्देशून दिले ते चांगले.  कोठलीहि कृति दिल्याप्रमाणेच करावी हे बरे.  मनाने त्यात बदल केला तर परिणामात पण बदल झाल्याचे आढळून येईलच.

कलोअ,
सुभाष