हा लेख हलकाफुलका आहे आणि काहीश्या अतिरेकातून मराठीच्या शुद्धीचा आग्रह धरणाऱ्या प्रवृत्तीला हलक्याफुलक्या पद्धतीने मर्म दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सन्जोपरावांचे अभिनंदन करायला हवे असे मान्य करत मी पुढील मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
सन्जोपराव अथवा इतरांनी अश्याच पद्धतीने इंग्रजी वापरण्यावर लिहिले तर नक्कीच गंमत वाटेल.
मराठीच्या दुरवस्थेसाठी मराठीभाषिकाचा न्यूनगंड अथवा उदासीनता प्रामुख्याने कारणीभूत आहे. सध्या तिसरा घटक म्हणजे शुद्ध मराठी वापरण्याची खिल्ली उडवायची, अतार्किक आणि हास्यास्पद अशी शब्द सुचवायचे अशी तिसरी आघाडी उभी राहिलेली दिसते. म्हणजे सर्वसाधारण अशी मराठी मंडळी नकळतच बिचकत नको ते मराठी शब्द असा विचार करायवयास सुरवात करतात. नकळतच असे वाटते की कुऱ्डाडीचा दांडा आणि गोतास काळ.
आजच्या स्थितीत असे दिसत आहे की इंग्रजी भाषा ही मराठीचा ग्रास घेणार परंतु अश्या अनेक स्थितीचा आपल्या भाषेने प्रतिकार केला आहे आणि काळांतराने नव्या दिमाखाने आणि नवौन्मेषाने परत मराठी निर्माण झालीही आहे. शेवटी या भाषेला ९०० वर्षाचा इतिहास आहे हे विसरता येणार नाही.
आपली भूमी ही ऋजू आहे, कोमल आहे, सर्वसहिष्णु आहे पण इतिहास असाही आहे येथे जे माजले, मत्त झाले त्यांना याच मातीने मातीतही मिळवले आहे हे कृपया कोणीही विसरू नये, मग ते स्वकीय असोत अथवा परकीय!