कुठल्याही गोष्टीचा अतिरेकी अट्टाहास हास्यास्पद कसा ठरतो याचे चित्रण करायचा प्रयत्न चांगला आहे.सध्या प्रचलित असलेल्या विषयावरील लेख, विनोदी असला तरी कृत्रिम वाटला. कशाची तरी ठरवून टिंगल केल्यासारखा. निखळ विनोदी वाटला नाही.<"अगं ए, ऐकलंस का? मी उष्णोदकयंत्र सुरु करतोय.> हे चक्क सरकारी पत्रक वाटते. घरात असे बोलले जात नाही. "पाणी तापत ठेवले आहे, तापले की अंघोळीला जाईन." किंवा "गरम पाण्याचे यंत्र सुरू केले आहे" हे स्वाभाविक आहे.
<"मला वाटते, ती शौचकुपात आहे.." आमच्याकडे 'ते' व 'ते' ठिकाण एकत्र आहे.>
रावसाहेब,
एक विनोद म्हणून देखिल हे आपल्याकडून अपेक्षित नव्हते. सुसंस्कृत घरात नवऱ्याने 'ही जरा आंत गेली आहे' असेच सांगितले असते आणि ऐकणारीला बरोबर समजले असते. घरात शौचालय व न्हाणीघर एकत्र आहे याचा उल्लेखही अनावश्यक वाटला.हे केवळ माझे मत. कदाचित ही दुसऱ्या कुणाला अजिबात न खटकणारी भाषा असेल.
शक्य तितके मराठी शब्द वापरणे वा तसा आग्रह हे अनेकांना खटकते हे मात्र खरे. अखेर कोणी काय भाषा वापरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण हे संकेतस्थळ मराठी भाषेशी बांधीलकी सांगत असल्याने आम्ही काही लोक मराठीचा प्रेमळ आग्रह करतो. इतर कुठेही याबाबत कुणाला सल्ला देण्याचा प्रश्नच येत नाही.
बाकी जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही:), आम्ही आमची मराठी कितीही हास्यास्पद ठरली तरीही मराठीचा प्रेमळ आग्रह हा करणारच.