मराठीप्रेमाला घरातूनच सुरुंग लागत असतील तर बाहेर या प्रयोगांचे काय होणार

इथे मनोगतावरही प्रतिसादांतून सुरुंग लागलेले दिसत आहेत, पण मराठीप्रेमाला नाही, मराठीप्रेमाच्या विरोधाला. 'दूरवस्तूदर्शकयंत्र', 'चलतहास्यचित्रमालिका', 'उष्णोदकयंत्र', 'अतिथीआगमनसूचकघंटिका' असे शब्द छापील मराठीतही वापरले जात नाहीत. मराठीप्रेमींचाही अशा मराठीला विरोधच असेल. लेखात त्यांचा वापर (कारण माहीत नाही) विनोदनिर्मितीसाठी आहे असे वाटले नाही.
लेखन खास 'सन्जोप राव' पठडीतले वाटले नाही. 'इंग्रजी शब्दांचे लफडे' चर्चेचा गद्य उत्तरार्ध वाटला.