छाया राजे, स्वाती दिनेश, रोहिणी, सन्जोप राव आणि अत्यानंद,
आपणा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.
ह्या लेखांमधील सर्व फोटो दुसऱ्या कोणीतरी काढलेले आहेत. मी नाही. ते सर्व मला ई-मेलने माझ्या मित्राने पाठवले होते. माझा कॅमेरा ह्या काळातच यायचा होता पण नेमका वादळाने कुठेतरी अडकला आहे. ह्याची अत्यंत खंत वाटली. कारण अशी अनेक दृष्ये होती ज्यांचे फोटो फार 'बोलके' आले असते. उदा. वादळा नंतर जवळ जवळ आठवडाभर पाण्याचा पुरवठा बंद होता. तेंव्हा एकाला मी रस्त्याच्याकडेला साचलेल्या पाण्यातून वाटी-वाटीने पाणी भरताना पाहिलं. असो. हे सर्व पुढच्या भागात येईलच.
सन्जोप राव,
खरे आहे तुमचे म्हणणे. मी इथे आलो तेंव्हा (१९८१) रिम-झीम पाऊस पडला होता. तोही ४ वर्षात पहिल्यांदाच पडला असे ऐकण्यात आले होते. हल्ली वर्षातून १-२ वेळा हमखास पडतो.