हल्ली कथा, लेख, विडंबने आणि अगदी पाककृतीही यांत काहीच नाविन्य नसते असे लक्षात आले आहे. आता काही लोक तसे लिहून दाखवतात आणि काही लोक असल्या लिखाणाकडे साफ दुर्लक्ष करतात. माणसे तितक्या प्रकृती.

त्यात वाईट वाटायचं, माफ करायचं किंवा अपेक्षाभंग करून घेण्यासारखे काहीच नाही. काही प्रतिसादही अपेक्षित असतात आणि काही अनपेक्षित, माणूस महत्त्व कशाला देतो हे महत्त्वाचे.