आमची प्रेरणा डॉ. संतोष कुलकर्णी यांची अजून एक अप्रतिम गझल मंतरलेल्या सायंकाळी
तंतरलेली सायंकाळी, चालत मी भरभर काहीसा..
श्वास जरा झाले जड होते...घाबरलेला स्वर काहीसा..
मेघ अनावर कोसळताना, वीज कडाडे नभही फाटे...
आणि स्मशानी अंधाराचा, अंथरलेला थर काहीसा..
कोण बरे हे हसते आहे, कोसळणार्या जलबिंदूंसम...
..भास अचानक स्पर्शाचा हा, अन थरकापे कर काहीसा...!
ही तर आहे काळीजादू...वा आहे हा खेळ मनाचा...
...का,मजला मातीमध्ये दिसला अस्थीपंजर काहीसा..
केवळ झाल्या गजराने ह्या जाग मला आलेली पुरती
सावरला "केश्या" काहीसा.. पण चढलेला ज्वर काहीसा...
-ई. केशवसुमार, मॅकल्सफिल्ड