आत्मकथन एका बारबालेचे
माझ्या जीवनात जे काही घडले,जे कडू-गोड अनुभव आले ते सर्वकाही माझ्या पुस्तकात स्पष्टपणे मांडले आहे. कोणाचा विश्वासही बसणार नाही. परंतु माझी कहाणी एक वास्तव आहे. या पुस्तकात अनेक गुपिते दडलेली आहेत. ती गुपिते जाणून घ्यावयाची असतील तर तुम्हाला माझ आत्मकथन तुम्हाला वाचावंच लागेल, असे बारबाला वैशाली हळदणकर यांनी सांगितले
मुंबईतील डान्सबारमध्ये आज 75 हजाराहून अधिक मुली आणि महिला काम करीत आहेत.डान्सबारवर उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी बंदी घातल्यानंतर महाराष्टृात आणखी एका सामाजिक प्रश्नावर बरेच वादळ उठले.न्यायालयाने बारवरील बंदी उठविली आहे. आता या प्रश्नी महाराष्टृ शासन सर्वोच्च न्यायालयात गेले आहे.बंदी उठेल की राहिल हे आज सांगता येत नसले तरी मुंबईसह अनेक शहरातील डान्सबारचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.समाजातील पन्नास टक्के मंडळीनी बंदीचे स्वागत केले आहे.तर उर्वरित पन्नास टक्के मंडळीने बंदीला विरोध्द केला आहे.बंदीविषयी मतमत्तांतरे असु शकतात. हजारो महिलांच्या रोजीरोटीचा प्रश्नही आहे.बारबालाच्या प्रश्नावर यापूर्वी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनेने प्रॉब्लेम्स ऑफ बारबाला ही पुस्तिका प्रसिध्द केली आहे. या व्यवसायात गेल्या अनेक वर्षापासुन काम करणाऱ्या वैशाली हळदणकर या बारबालाचे पुस्तक लवकरच बाजारात येत आहे.
वैशाली स्वत: विषयी व डान्सबारबाबत या पुस्तकात बरंच काही सांगणार आहे. ती आता चाळीस वर्षाची आहे. ती डान्सबारकडे का वळली.तिला कोणते अनुभव आले याविषयी तिने माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.वैशाली म्हणाली, मी सुंदर गाते. एका सुसंस्कारित घरात माझा जन्म झाला.माझे वडिल ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. मी एक मराठी मुलगी आहे.मी टिपीकल मुंबईकर असल्याने माझ आत्मकथनही मराठीच येत आहे.ते प्रसिध्द होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा काळे यांनी प्रोत्साहन दिले.ती म्हणाली की, मी घरातील मोठी मुलगी.माझं कौतुक होण्याऐवजी वडिलांनी तिरस्कारच केला.भावाचा जन्म झाल्यानंतर तर त्यामध्ये अधिकच भरच पडली. अजाणती असताना एका 60 वर्षाच्या वडिलांनसमान असणाऱ्या एका माणसाने अश्लील चाळे केले.बालपणही सुखात गेलं नाही.खूप वाईट अनुभव आहेत. सर्व काही आठवले की आजही अंगावर शहारे उभे राहतात.
वडिलांच्या छळाला कंटाळून मी घर सोडले. एका पेंटरशी विवाह केला. प्रारंभी संसार सुखात चालला होता.पैशाची चणचण होती.परंतु आम्ही दोघ सुखात होतो.पुढे पुढे पतीचीही साथ मिळेना.मला मारहाण होऊ लागली. उपासमार होऊ लागली.खूप कंटाळा येऊ लागला. आता आपण काही तरी केले पाहिजे. स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे.असे ठरवून मी नोकरीचा शोध घेऊ लागले.माझ शिक्षण कमी असल्याने नोकरीही मिळेना. माझा आवाज चांगला होता.आपण गाणं म्हणू शकतो.हा आत्मविश्वास होता.शास्त्रीय संगीताचे धडे घरात मिळाले होते. मी बारमध्ये गाण्यास सुरुवात केली. बारशी संबंध आला. गाणी गात गात नि छमछम नाचत,नाचत मी डान्सबाची गर्ल कधी झाले हे मला कळलच नाही. माझी पहिली नोकरी बारमधील होती आणि शेवटही बारमध्येच असेल. असे वैशाली सांगत होती
गेल्या पंधरा वर्षापासून मी बारबाला म्हणून काम करुन माझा व मुलांचा चरितार्थ चालवत आहे. या वर्षात मला खूप बरे-वाईट अनुभव आले आहेत.अनेक चांगल्या व वाईट माणसांचे रंग मला पाहता आले अनुभवता आले.पतीकडूनही सुखसमाधान मिळालं नाही.खरं तर नवऱ्यानं मला आधार द्यायला हवा होता.पण भलतंच घडत गेलं. त्यांनी मला घराबाहेर काढलं. मुंबईतील डान्सबार व्यवसायात काम करणाऱ्या हजारो मुली आणि महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खूप मोठ्या अभ्यासाची गरज आहे.डान्सबारवर बंदी घालून आर. आर.पाटील काय साध्य करणार आहेत ?हे माहित नाही.
नवऱ्यांने सोडून दिल्यानंतर माझं टारझन नावाच्या एका गॅंगस्टरशी नव नात जुळलं.मात्र त्याच्यावर खूनाचा गुन्हा होता.पोलिसाना तो हवा होता. हे मला माहित होत परंतु तो माझ्यासाठी चांगला होता. दुर्दैवाने आमचे हे प्रेमप्रकरणही तुटल.ं मी खूप निराश झाले. आत्महत्येचा त्यावेळी माझ्या मनात विचार आला तसा प्रयत्नही केला.परंतु आचार्य रजनीश ओशो यांच संभोगाकडून समृध्दीकडे या हातात पडलं.मी ते झपाटल्यासारख वाचून काढलं.या पुस्तकाने माझ आयुष्य बदललं.जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.वर्षा काळे व ओशो माझ्यासाठी दैवत आहेत.त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे.पुस्तक लिहिण्यासाठी काळे यांनी खूप प्रोत्साहन दिले.त्यांच्यामुळेच हे पुस्तक आकाराला येत आहे.
खरं तर मला वकील व्हायचं होतं.ते ही जमलं नाही. आज मी चाळीस वर्षाची असले तरी हार स्विकारलेली नाही.बारबालांच्या हक्कासाठी मी यापुढे संघर्ष करणार आहे.डान्सबारविषयी एकी बारबालाविषयी काही जाणून घ्यावयाचे असल्यास माझ हे पुस्तक सर्वानी वाचावं.असं मला वाटतं. त्यामध्ये काही उनिवा असतील तर त्याही मला सांगाव्यात.
शास्त्रीय संगीत हेच जीवन
आम्ही दादर(मुंबई)ला राहत असताना आमच्या घरी छोटे गंधर्व आले होते. ते किराणा तरा माझे वडील ग्वाल्हेत घराण्याचे.हे घराणे तसे जवळचे. शास्त्रीय संगीत हे माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.संगीताशिवाय मी जगूच शकत नाही.संगीताचे बाळकडू मला मिळाले घरातच मिळाले आहे. कबीराचे दोहे मला तर मुखोदगत आहेत. वाचनाच वेड असल्यानेमुळेच माझ्याकडुन तोडकंमोडकं लिखाण होऊ शकले. असे वैशाली हळदणकर हिने सांगितले.