मिसळीची भाकरी

  • दोन वाट्या उडीद डाळ, दोन वाट्या चणा डाळ.
  • दोन वाट्या बाजरी, दोन वाट्या ज्वारी.
  • एक वाटी मक्याचे दाणे.
१५ मिनिटे
४-५ जणांसाठी

दोन्ही डाळी खमंग भाजून घ्याव्यात. मग इतर तिन्ही जिन्नस घालून एकत्र बारीक दळून आणाव्यात. नेहमीप्रमाणे भाकरी कराव्यात.

या पिठाच्या दुधातल्या दशम्या अधिक चवदार होतात.

आई