तस्वीर तुझी
तीः
भाळीची टिकली तू आहेस प्रिया,
डोळ्यांतील काजळ दुःख तुझे ना |
दृष्टीसमोर राहू तुझ्या,
पाठी पाठी राहू तुझ्या,
चलू ईप्सितापाठी || १ ||
तोः
तुझ्यातच नजर, जेव्हा ही गुंतली,
असशी तू प्रिये जिथे, तिथे माझे मन |
तुझी दृष्टी जेथे पडे,
तुझे केस होती खुले,
राहु त्याच जागी मी || २ ||
मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००७०७२०
हे काही मौलिक गीत नाही. अनुवादित आहे.
चाल? मूळचीच. मात्र ती ओळखावी लागेल.
मुखडाही दिलेला नाही. तो ही ओळखायचाय.