एक दिवस जॉर्ज बसला पाहत आपले सिंहासन१
आणि झाली तेवढ्यात त्याला आंघोळीची आठवण
जॉर्ज गेला आंघोळीला, राहिला पंचा बाहेर
त्यात होते घर त्याच्या बायकोचेच माहेर
काय करावे? काहि सुचेना! अडला राजा आत
कंटाळा आला म्हणून बसला नवकविता गात
नवकवींची प्रतिभा वाटे महाराजांना अगाध
सम्राटांचा स्पेशल होता त्याचा अभ्यास प्रगाढ
फतवा काढला राजाने मग 'नवयुग आणा'
पण बिचाऱ्या कवींना कोणी देत नसे १ आणा
लक्षात आले राजाच्या की आहे हे न्हाणीघर
पंचा नसता फतवा फसतो तिथल्या तिथेच जबर
तेवढ्यात त्याला आठवली एक इंग्लिशमधली म्हण
आपल्यासारखाच प्रत्येक कुत्र्याचा असतो दिवाळ सण
आता आपला भुंकल्याशिवाय लागणार नाही निभाव
लागला राजा तेव्हापासून करायला भॉव् भॉव्
ते ऐकून वाटले कवीला जेव्हा होते पंचाईत
राजा करतो नेहमीच तेव्हा जोरात भॉव् भॉव्
लागला कवी शोधू त्याच्या कवितेसाठी यमके
सगळी खाल्ली होती ती त्याच्या प्रतिस्पर्ध्याने
म्हणून लिहिली त्याने एक कविता अजरामर
'भो पंचम् जॉर्ज'
१ हेच ते त्याला दिवाळसणानिमित्त आंदण मिळाले होते असे (फक्त) आमच्या ऐकिवात आहे.