मार्बल केक

  • २५० ग्राम मैदा,२५० ग्राम तूप/लोणी/मार्गारिन,२५० ग्राम साखर
  • २ चहाचे चमचे भरून बेकिंग पावडर,१चिमूट मीठ,५ अंडी,१/४कप दूध
  • १.५ चमचा वॅनिला अर्क, २ ते २.५ मोठे चमचे कोको पावडर
दीड तास
५,६ जणांना भरपूर

तूप चांगले फेसून घेणे,साखर घालून फेसणे. अंडी घालून फेसणे.नंतर वॅनिला अर्क घालून फेसणे.
मैदा+बेकिंग पावडर+१ चिमूट मीठ  एकत्र करणे आणि वरील मिश्रणात हळूहळू मिसळणे.नंतर थोडे दूध घालणे व मिश्रण एकजीव करणे.
आता मिश्रणाचे २ भाग करून वेगवेगळ्या वाडग्यात काढून घ्या,एका भागात कोको पावडर घाला व दुसरा भाग तसाच ठेवा.
केकच्या साच्याला तूप लावून घ्या.दोन चमचे कोकोयुक्त मिश्रण आणि २ चमचे वॅनिलाचे साधे मिश्रण असे दोन्ही मिश्रणे संपेपर्यंत घाला‌. साचा तिरपा करून मिश्रण सगळीकडे सारखे पसरवून घ्या.
अवन प्रीहिट करून घ्या. १८० ते २०० अंश से. ला ३० ते ३५ मिनिटे बेक करा.

१.केक नेहमी थंड झाल्यावर कापावा म्हणजे स्लाइस तुटत नाहीत.
२‌.केक कापल्यावर स्लाईस उघड्यावर ठेवायच्या नाहीत,त्या कोरड्या पडतात.

सौ. अमृतेबाई.