मला 'काश' ह्या उर्दू (का फारसी?) शब्दाला मराठी प्रतिशब्द मिळू शकेल काय? मी बऱ्याच जणांना विचारलंय पण 'जर' (किंवा 'जर असं असतं तर') ह्याशिवाय दुसरा कोणताही शब्द मिळाला नाही. मला वाटतं की 'काश' ह्या शब्दाची छटा 'जर' ह्या शब्दाला नाहीये...
त्याप्रमाणेच, क्लिप्बोर्ड (किंवा clipboard) ह्या कंप्युटरजगतात अनेकदा वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काही प्रतिशब्द आहे का? (जिथे आपण काही गोष्टी 'कॉपी' करून ठेवू शकतो आणि नंतर गरज पडेल तसे तिथून घेऊन दुसरीकडे 'पेस्ट' करू शकतो.)
मला 'टाचणपट' असा एक शब्द सुचला आहे. कसा वाटतो ते कळवावे.