बुटरमिल्श कुकन (ताकातला बदामाचा केक)

  • २ कप गोड ताक
  • १.५ कप साखर
  • ४ कप मैदा
  • १ चिमूट मीठ
  • ५ ते ६ चहाचे चमचे बेकिंग पावडर
  • २ चमचे वॅनिला अर्क,१ लिंबाचा रस+१/२ लिंबाची किसलेली साल
  • ३ अंडी
  • २०० ग्राम बदाम तुकडा
  • १५० ते २०० मिली अन व्हिप्ड क्रिम
१ तास

मैदा+मीठ+बेकिंग पावडर एकत्र करणे. त्यात साखर,अंडी व ताक  घालणे आणि चमच्याने सारखे करून एकजीव मिश्रण तयार करणे. त्यात वॅनिला अर्क आणि लिंबाचा रस व किसलेली सालं घालणे आणि सारखे करणे.

एका उथळ बेकिंग ट्रेला तूप/लोणी लावून घेणे व त्यात हे वरील मिश्रण ओतणे. त्यावर बदाम तुकडे पसरून पूर्ण मिश्रण झाकून टाकणे.

२० ते २५ मिनिटे प्रिहिटेड अवन मध्ये बेक करणे.

केक बेक झाल्यावर गरम केकवर अनव्हिप्ड क्रिम  सर्व बाजूंनी ओतणे म्हणजे ते आत जिरेल. केक गार झाल्यावर वड्या कापणे.

१. ह्या केक साठी तूप/लोणी ची आवश्यकता नाही.
२. उथळ बेकिंग ट्रे/डिश घेणे जरुरीचे आहे.
३. हा केक खूप दिवस टिकत नाही.२, ३ दिवसात संपवावा लागतो. (अर्थात तसा तो एकाच दिवसातही संपतो म्हणा!)
४. बदामतुकड्याऐवजी काजूतुकडा किवा डेसिकेटेड कोकोनट किवा इतर काही आवडीची ड्रायफ्रूटस घालूनही केक करता   येईल.

त्सेंटा आजी