नाथ कोडे

ज्येष्ठ लेखक डॉ. मधुकर वाकोडे ह्यांनी सांगितलेले हे गीतरूपी कोडे आहे.


मै मर गया तेरे लिये
तू ना मरना मेरे लिये
जो तू मर गयी मेरे लिये
वो उपर खडा तेरे लिये


गीत सोपे असले तरी खाली मराठी भाषांतर दिले आहे (नाही तर निरोप काढून टाकण्याची भिती आहे) -


मी मेलो तुझ्यासाठी
तू न मरावे माझ्यासाठी
जर तू मेलीस मजसाठी
वर उभा असे तो तुजसाठी


नाथसंप्रदायातील एक जोगी हे गाणे रोज म्हणायचा आणि एके दिवशी वाकोडेंनी त्याला गीताचा अर्थ विचारला.  तो अर्थ मी उद्या येथे प्रकाशित करणारच आहे. तोपर्यंत आपणही जरा विचार करून बघावा अशी विनंती आहे.  अशा प्रकारची गूढ गीते/लोकगीते कुणाकडे असतील तर इथे अवश्य प्रकाशित करावी.


आपला,


-राजेन्द्र