तुळस

इतकी वर्षे इथे जगलो,
साहजिकच आहे नातीगोती जुळवणे -

सगासोयऱ्यांची येजा सुरू  झाली...
प्रत्येकांच्या आपापल्या कथा असतात,
... आणि व्यथा असतात.
कामे असतात आणि कहाण्या असतात -
उसंतच नाही,
स्वत:शी बोलायची, स्वत:चे ऐकायची -

कधी वाटले, हे दुर्स्वप्न आता संपायला हवे,
पण स्वप्न कसले, ऐकतच नाही...

आपले तोल सांभाळत आले,
साऱ्यांना धीर देत आले...
आयुष्याचा झरा, कधीतर चैतन्यसागरात मिसळणारच -
असे सघळ्यांना सांगत आले -
वर्दळ ओसरल्यावर जाणवले, कि,
स्वत:ला धीर द्यायचे अजून राहिले च आहे...

मधूनच तुझा आवाज ऐकू येतो,
तुझे शब्द जसे च्या तसे आठवतात -
तुझ्या आवडीचे काही दिसले,
कि डोळ्यांच्या कडा ओल्या होतात -
कधी रिमझिम धारा झरते, कधी अनावर वादळ कोसळतं!
कधी अस्फुट हसू उमटतं, कधी ओलेचिंब डोळे उमलतात -

तू माझ्या बरोबर असण्याची मनात साक्ष असून सुद्धा,
तू नसण्याची जाणीव आतून पोखरायच्या आधीच,
मी तुझ्या आठवणींचे तुळशी वृंदावन जपणार आहे -
तुला आवडेल ना?