सांग रे जीवलगा तुला कशी विसरू
ते नभ आले बघ दाटून
शतधारा लागल्या झरू
कोमल फुले लागली बघ निथळू
आठवणींच्या हिंदोळ्यावर सांग किती रे झुलू
पानेही बघ विखुरती जिकडे तिकडे
मनाच्या प्रांगणात तुझ्या स्मृतींचे सडे
मातीचा बघ सुगंध पसरला चहूकडे रानात
गंध तुझाच रे भिनला सर्व नसानसात
वाराही बघ धावून आला दरीखोऱ्यांतून
काया शहारते माझी स्पर्श तुझा अंगाअंगातून
चिंब भिजत उभी मी कितीवेळ अशीच एकटी
हात न तुझे माझ्याभोवती नयनी अश्रूंची दाटी
अशा धूसर सायंकाळी झाले मी बावरी
स्मरणात माझ्या तुझ्या श्वासांची फुले सावरी
सुप्रिया