एग फ्राईड राईस

  • तांदूळ २०० ग्रॅम
  • मोठे कांदे ३ - मध्यम चिरलेले
  • अंडी ३
  • तेल दोन पळ्या
  • क्रश्ड मिंट दीड चमचा
  • बेझल दीड चमचा
  • सेलरी सॉल्ट चवीकरता
  • टबॅस्को सॉस - ऐच्छिक
३० मिनिटे
दोन जणांसाठी पोटभर

भात फडफडीत शिजवावा आणि गार करावा.

तेल तापवावे. धुरावल्यावर कापलेला कांदा घालून हलवत राहावे. कांदा गुलाबी झाल्यावर ज्योत बारीक करावी. बेझल (basil) आणि क्रश्ड मिंट (crushed mint) घालून सारखे करावे.

ते एकजीव झाल्यावर शिजलेला भात घालून ज्योत मोठी करावी आणि हा सर्व मसाला त्याला नीट लागेल असे परतावे. ज्योत परत बारीक करावी.

अंडी फोडून फेटावीत.

फेटलेली अंडी भातावर घालून ज्योत मोठी करावी आणि पटापट हलवावे. भातातून वाफ निघताना दिसू लागली की ज्योत बारीक करून चवीपुरते सेलरी सॉल्ट (celery salt) घालावे.

पाच ते दहा मिनिटे हलवत राहावे आणि गॅस बंद करावा.

आवडत असल्यास टबॅस्को सॉस  वरून शिंपडावा.

सोबत फिंगर चिप्स वा/आणि चिरलेली कांद्याची पात द्यावी.

स्वप्रयोग