प्रियदर्शनी

सण आले ग आनंदाचे, उत्साहाचे

पंचमी, दसरा  आणि  दिपावलीचे
शृंगार करते सणाला मी आनंदाने
सजवे अलंकार तनुवर उत्साहाने
बोटात घालते अंगठी सोन्याची
आठवण असे सजणाच्या प्रेमाची
गळ्यात मंगलमणी आहेत सजणे
सुवासिनीचे असते  सौभाग्यलेणे
चमकती हातात हे सुंदर बिलवर
पित्याने केले असती हौसेखातर
बिलवरामागे ह्या पाटल्या असती
दूधात शर्करासम शोभा वाढवती
तोड्यांची बघ ती आगळी अदा
बिलवरा पुढती चमकती सदा
नाकात असते मोरणी हिऱ्याची
वाढवी शोभा सुंदर या वदनाची
कानी झळकती काप सोन्याची
आठवण माझ्या वाढदिवसाची
शोभून दिसतो बाजुबंद दंडावरती
वाटे सजणाने घेतला हात हाती
सजला गळा तन्मणी हाराने जरी
सुंदर कलाकुसर असते त्यावरी
केसात माळे ही बिंदी सोन्याची
पाहून तिला सय येते सख्याची
पायात तोरड्या वाजतात छुमछुम
अस्तित्व माझे समजते ग हरदम
चढवुनी अशी आभुषणे सोन्याची
प्रियदर्शनी बनते मी ही सख्याची