दु:ख

दुःख

गालावर ओघळले दोन थेंब
पुसायचे राहून गेले ...
उरात दडवलेले दुःख माझे
नकळतच कळून गेले ...
दिले बहाणे अगणित
पण डोळे मात्र ओले झाले ...
पापण्यांना जडलेले मोती
आनंदाश्रू म्हणून खपून गेले ...
मनाची भरभक्कम वेस
अश्रू अलगद ओलांडून गेले ...
पापण्यांना आलेले पुर 
हसऱ्या चेहऱ्याने जागीच थोपवले ...
आतून होतो दुःखी जरी
चेहऱ्यावर मुखवटे चढविले ...
हसऱ्या अभिनयाला माझ्या 
सगळेच खरे मानून गेले ...
गालावर ओघळले दोन थेंब
पुसायचे राहून गेले ...
उरात दडवलेले दुःख माझे
नकळतच कळून गेले ...
                                       --- वेडा कवी - अमोल.