तुझ्या माझ्या जगण्याचे

तुझ्या माझ्या जगण्याचे;
गणितच कुठेतरी चुकले होते;
तुझ्या सावलीची साथ घ्याया;
मला उन्हात चालावे लागले होते.

मी उधार घेतले या जगण्याला;
उमलण्याचा अर्थ न कळे मनाला;
येणारे क्षण जरी मला सोबती;
रस्त्यात माझ्या एकांत दाटलेला.

मी अबोल झाले हसता हसता;
ओठांवर दबली स्मित वेडी;
माझ्या सुखाच्या परडीत तेव्हा;
तुझ्या आठवांची वेदना मिळाली.

तुझ्या असण्याचे कौतुक हवे कशाला?
मी अशीच राहीन तुझ्या आठवांना घेऊन;
तुला कळो किंवा न कळो;
मी जगेन फक्त तुझीच होऊन.