मानावा भास्कर नमन ताराप ताराप गागा ।
मानावाभा, स्करनमनता, रापताराप, गागा ॥
ह्या मंदाक्रांता वृतात आणखी एक समस्यापूर्ती! बघा करून!!
मीच सुरुवात करतो, ती अशीः
आकाशाचे, क्षितिज जगती, पाहता हर्ष, वाटे ।
जाता तेथे, मग क्षितिज ते, आणखी दूर, जाते ॥
जाणा तैसे, क्षितिज जगती, एक आहे, सुखाचे ।
प्राप्तीसाठी, अथक श्रमता, दूरची दूर, जाते ॥
इथे समस्यापूर्ती साठी फक्त शेवटली अर्धी ओळ म्हणजे
'दूरची दूर, जाते'
एव्हढीच काय ती प्रत्येक कडव्यात यावी अशी अपेक्षा आहे.