वेळ

ती वेळ गेली
अन घड्याळाचा तासकाटाच
जणू हरवून बसला

मोठा काटा मिनिटे मोजू लागला
पण किती आणि का फिरायचे
कळेनासे झाले त्याला

आली आली म्हणतानाच
ती वेळ निघून गेली
मस्तीत भिरभिरणारा सडपातळ काटा
कळलेच नाही बिचाऱ्याला
आपला आधार निघून गेल्याचे

आयुष्याचे घड्याळ
सातत्याने फिरणारे
कधी ऊर्जा संपल्याने, कधी खेळ संपल्याने
कधी पाणी गेल्याने, कधी कोणत्या, कधी  कोणत्या
व्याधीने त्रस्त
पण तरीही धडपडणारे
कधी वेगात चालणारे
कधी मागे पडणारे
पण कोणासाठीही न थांबणारे

नवे काटे अननुभवी
काम चोख करतील

घड्याळही नवे घेता येईल
पण वेळ निघून गेलेली असेल.