चित्रातल्या व्यक्तिरेखेसारखं जगावं,
सजीव असून दुसऱ्याला चित्रासारखं वाटावं
निर्जीव असूनही नेहमी जिवंत असावं
जगताना संवेदना, विचार, शब्द,
सारं काही बोथट करावं ,
मेल्यानंतर मात्र माणसाने
अमर व्हावं!
जगण्यातलं मरणं आणि मरून जगणं
असण्यातलं नसणं आणि नसण्यातलं असणं
प्रत्येकाला आयुष्यभर असंच रहावं लागतं
खरोखर असंच असावं लागतं !
-साधना लाळे.