ओव्या

विश्वाचा आधार । तो मंडलाकार ।
त्याने चराचर । व्यापियले ॥

चंद्र आणि सूर्य । ग्रह आणि तारे ।
मंडलात सारे । भ्रमतात ॥

तळ्यांची मंडले । नद्यांची कुंडले ।
जळात सांडले । मंडलचि ॥

जीव जो जन्मला । मृत्यूची त्या भीती ।
चक्राकार गती । जीवनाची ॥

जन्म आणि मृत्यू । मंडलाअधीन ।
जाणी जो हे ज्ञान । सुखावला ॥

जन्म मी पाहिला । मृत्यूच्याच दिनी ।
उरली ती मनी । निर्गुणता ॥

पाहीन ज्या दिनी । आपुले मरण ।
जन्माचा तो क्षण । सार्थ होई ॥