अंतर फार नाही

ओठात शब्द अडले;
हृदयात भाव काही;
सांगण्या तुला मी शोधिते;
ती वेळ का येत नाही.

मन मुक्त तुझ्याशी हसताना;
ही वेळ आली दुरावण्याला;
कळले मला ना तुला;
हेच दुःख आता मनाला.

तुझे मला भेटणे;
घडले अशा ठिकाणी;
नव्हती कोणती वाट तेव्हा;
नव्हती कोणती दिशाही.

तरी चालणे आपले;
लावून आस मनाशी;
तुला मला आठवणारी;
वाट होती की रे प्रवाही.

असू दे तुझाच गंध;
मी आयुष्य जगताना;
राहू देत शब्द अबोल;
मौनात जगताना.

जरी जाहले दुरावे;
तरी अंतर फार नाही;
माझे आयुष्यच आता;
तुझ्या प्रीतीत भिजून राही.