भ्रमिष्ट

एकटाच तो
बसला होता
समुद्रकाठी
खडकावरती
सायंकाळी
बुडणार्‍या
सूर्याला
निरखत...

सूर्यबिंब
बुडल्यावरती
कोसळला
पाण्यात;
तळाशी
असेलही तो 
कुठेतरी
सूर्याला
शोधत...