लाभेल का?

लाभेल काय मजला, कोठे, कधी निवारा?

हा चंद्र पेरताना, माझ्या पथी निखारा
उध्वस्त गांव तरिही मी बंदिवान आहे,
गेले निघून तेही, ज्यांचा कधी पहारा!
अवतार संपले वा भ्यालाय माणसांना
येणार नाही देव, कोणी किती पुकारा!
सापांस माणसांचा वारा कधी न लागो
येथे विषांस त्यांच्या आहे तरी उतारा!
ओठांत खेळविते माझेच गीत आणि
शब्दांत शोधिते का श्वासांतरी शहारा?
आता कशांस येणे समोरासमोर दोघे?
प्रतिबिंब ना मलाही आरशांस नाही पारा