चौकातला वेडा कुठे गेला
टकमक बघे लोकांकडे, खाई कुणी देतील ते,
कपडे न ते चिंध्याच त्या, डोळ्यांतला वेडेपणा
चौकातला वेडा कुठे गेला.....?
टायर फुटे चपला बने, कापड जुने टोपी बने,
मळकी तिरस्करणीय वस्त्रे जी शिसारी आणती
दिसताच तो बदलायची वाटा स्वतःच्या माणसे,
दाबून नाके बायका रस्ता कसा ओलांडती
पोरे किती औत्सुक्य नजरेचे तिथे ओवाळती,
केव्हातरी मारी खडे तो ओरडे अन हासती
चौकातला वेडा कुठे गेला?