म्हणतंय कोण इथे दु:खात
आज जगतोय आंम्ही
सुखे सारी जीवनातील
जिव्हारी ,ह्या सोसतोय आंम्ही
वर्तमानात ह्या आज इथे
जगतोय विरळा वेडा पीर
झगडत जीवनाशी जगाया
भविष्य रोज भोगतो आंम्ही
पानेच इतिहासाचीच काय
ईतिहासच आता जीर्ण झाला
विसरलेल्या त्या ईतिहासाची
वेदना आजही सोसतो आंम्ही
विश्वास म्हणे तो कुठे
पानिपतात तिथे ठार झाला
लक्तरांच्या पखाली त्या
शिरी आज वाहतो आंम्हि