जमीन बळकावली स्वभाषिकांनी
घरे हिसकावली स्वधर्मियांनी
कागदावरले आम्ही शेतकरी
स्वप्रदेशातच शोधतो भाकरी
हा देश माझा , मी रोज मारतो बोंब
जाळती घरे ते, अन आगीचे डोंब
जात नसते म्हणतात गुन्हेगाराला
आजकाल देशभक्तही म्हणतात अतिरेक्याला
पोथ्या, पुराणाच्या ज्ञानासाठी कल्लोळ झाला
आय टी च्या जगात समान संधी प्रत्येकाला
वेळीच जर नाही सावध झाला
तर, हे ज्ञान चालले कायमचे परदेशाला.