एकही अक्षर

काएकी कुठून कैशी
ल्लोळातुन उमटे ऐशी
हीन स्वरांची शुभ्र रेष ती

जाणत्या त्या विहरी वेली
क्षत्रपतीच्या कुरणावरुनी
विकुहरातील बनुनी छाया

रसावुनी मग येई रावा
रुभूमीकणघृत रगडाया
राजीर्ण त्या जरासंध-सम
चके समस्त एकवटाया

नाद जोडुनी प्रतिपदमात्रे आरंभीचा
ही कविता मग अधर दिशेने बोधे वाचा

शब्दार्थ -
विहरी - विहरण करतात
क्षत्रपती - पृथ्वीपती
घृत - तेल (येथे तूप असा अर्थ घेऊ नये)
प्रतिपदमात्रे - (कवितेच्या) प्रत्येक ओळीतील
अधर दिशेने - (वरून) खालच्या दिशेने
बोधे - समजून

(कविता समजल्यास/न समजल्यास निदान शेवटच्या कडव्याचा अर्थ समजून घेऊन त्या प्रमाणे कृती करावी.. मग खरा अर्थ समजेल)


- शंतनु भट