तशी अजूनही माझ्यातल्या पावसाची लक्षणे
दिसतात.. रीतसर!
मी सैरभैर होतो
मनावर मळभ येतं
पापण्यात ढग जमा होतात
रंध्र रंध्राची ओंजळ होते... रीतसर.
मग
आसवांच्या सरी येतात
बरसतात रिमझिम, मुसळधार वगैरे
अन् पावसाळा संपतो....रीतसर.
पण गेले काही पावसाळे
हा पाऊस काहीच शांत करत नाही..
उलट
आतल्या ग्रीष्माची तलखी
वाढवूनच जातो.
आता हेही..... रीतसर?