पक्षी

तुज पंखांनी उंच भरारी घ्यायची आहे

घरट्याकडे अपुल्या तुज यायचे आहे........ ॥ धु ॥

सात समुद्रापलिकडे असे तुझी धाव

जिथे कुणाला नसे कुणाचाही ठाव

दाण्यांसाठी दाही दिशा फिरायचे आहे

घरट्याकडे अपुल्या तुज यायचे आहे....... || 1 ||

उडण्याचे बळ दिले तुझिया पंखात

चोचीने घास भरविला तुझिया चोचीत

त्या आईला पुन्हा पुन्हा भेटायचे आहे

घरट्याकडे अपुल्या तुज यायचे आहे...... || 2 ||

ऋतू  पालटूनी आला उन्हाळा

हृदयाला बसती आठवणीच्या झळा

पाण्यासाठी धरतीवर उतरायचे आहे

घरट्याकडे अपुल्या तुज यायचे आहे..... || 3 ||

असेल तू जगाच्या  दुसऱ्या टोकाशी

इथे उगवतो सूर्य तिथे असेल शशी

अंधारातुनी प्रकाशाकडे उडायचे आहे

घरट्याकडे अपुल्या  तुज यायाचे आहे... || 4 ||