तो फार आब्रूदार होता

ही मनाची हूल होती, की तुझा जोहार होता?

जो निवारा शोधला मी तो जिवाला भार होता.

का तुझ्या आता तनाचा नीर्दयी पाषाण झाला?

मी उराशी पाळलेला तुच काळाशार होता.

घातले जे तू मला ते शेवटी कोडेच होते,

का फुकाचा वेळ गेला, जो सुखाला वार होता.

घेतला आहे जरासा भावनेचा धीर आता,

ऐरवी तुझ्या क्षणांचा मांडला बाजार होता.

घेतली माझ्या फुलांची बागही त्याने परंतू,

मी न दीला दाखला, तो फार आब्रूदार होता.

शोधिला नाही जरी मी कासरा तो फासणारा,

जाणले, माझाच येथे प्राण हा जाणार होता.