मोडी लिपी

(असच इथे कुठे तरी " मराठी फोंट चा " विषय दिसला त्या वरून आठवल - हेमाद्री नावचा एक फोंट आहे - मोडी लिपी चा  !!!!)

 मोडी लिपी :
जवळपास सगळ्या मराठी मानसान्ना ऐकून तरी माहीत असते , मला ही असच कुतुहल होत म्हणून माहीती काढली  -
१) हेमाद्री पंत , देवगिरी च्या यादवांचे पंतप्रधान , त्यानी हि लिपी तयार केली खास जलद लेखना साठी .
२)मोडीला पैशाच लीपी असेही म्हणतात ( राक्षस लिपी असेही म्हणतात काही जण  )
३) मोडी लिपी मराठी इतिहासाची चावी आहे कारण जवळपास सगळेच ऐतिहासिक दस्तैवज मोडीत आहेत !
४) मोडीत १५ लाख कागदपत्रे वाचकांची वाट पाहत पडून आहेत ( ही अजून पर्यंत कोणीही वाचलेली नाहीत  विचार करा किती इतिहास दडून पडला असेल त्यात !! ) { रिसेंट अपडेट : परवाच कळाले पुण्यात अजून काही कागदपत्रे सापडली आहेत आता  एकुण कागदपत्रे संख्या ४० कोटी !!! )
५)मला स्वतःला आता मोडी थोडफार वाचता येत , ( आमच्या घरी कल्याण्स्वामींच्या हस्ताक्षरातले 'मनाचे श्लोक' होते आता ते शोधतोय ) समर्थांचे , शिवरायांचे , पेशव्यांचे लेखन आता मी स्वतः वाचू शकतो ही कल्पनाच मला खूप रोमांचित करते )

६)मुंबैत मोडी लिपी चे क्लासेस चालतात दादरला  शनिवारी संध्याकाळी , ठाण्याला रविवारी सकाळी !!!

अधिक माहीती साठी  " मोडीलिपी . कोम "