शब्दात काय सांगू ही वेदना उरीची;
मी रातराणीप्रमाणे तळमळत गेले.
कशी आता मी मिळवू ती रात्र मीलनाची;
माझे कोरडे उसासे मोजित मी गेले.
किती आता मी विसरू चाल तुझ्या पावलांची;
फक्त तुझे माझे क्षण आठवीत मी गेले.
किती वेळ मी आवरू कल्लोळ तुझ्या आठवांचा;
माझी स्मृतीच की रे हरवून आज गेले.
हे वरदान म्हणू की हा शाप भाळीचा;
उःशाप काय मागू म्हणून गोंधळून मी गेले.
उमगले मला जरी रात्र ही अंधाराची;
तुझ्या सावल्यांचे अस्तित्व शोधीत गेले.
गेले जरी विरुनी स्वप्न माझ्या मनीचे;
मी त्याच राखेतून पुन्हा झेप घेत गेले.