जीवनाबरोबर

यावंस वाटत होत खर,  का कोण जाणे ?
येऊन जाईचिस तू , नजरेसमोर
पण माझच येण व्हायच नाही !

शांत संध्याकाळी, पायघोळ घालत रात्रीचा
नाद उमटायचा तुझा, कानात
पण, बोलणं माझच व्हायच नाही!

खळ खळत ,मोकळे पणाने उधळायची
मोती मुक्तकंठे तू, माझ्यावर
पण, वेचणं माझच व्हायच नाही!

मधला काळ बराच वाहिला, जीवनाबरोबर
उलटा वाहतो प्रवाहाच्या, तुझ्यासाठी
पण, आता मात्र थकायचं नाही!