आज का कोणास ठाऊक,
तू बदललायस असं वाटतंय;
तरी तुझं हरणं माझ्या;
मनात उगाच सलतंय.
आठवतं राहतं मला नेहमी;
तुझं उगाचच रस्ता बदलणं;
सारं विसरायचं ठरवलं;
तरी तिथूनच पुन्हा सुरवात होणं.
तू चिरडतंच राहिलास पुन्हा पुन्हा;
माझा तुझ्यावर असलेला विश्वास;
तू असा नाहीसच म्हणत मी;
बांधत राहिले मनाला सुखावणारे कयास.
खरंतर मला माहीत होतं;
मी स्वप्नांसाठी रात्र थांबवली होती;
तू परत येणारयस म्हणून;
मी वाट अडवून ठेवली होती.
तसं बघायला गेलं तर;
मी जिंकलेच होते की रे;
पण विश्वास हरवलेल्या माझ्या डोळ्यात ;
तुझी ओळखही वेडी हरवत गेली रे.
तू डोळ्यांनी सांगायचास;
नव्याने सुरुवात करू आपण;
तुझे माझे दोघांचे राहिलेले क्षण;
पुन्हा नव्याने सुरुवात करू.
राहिलेल्या क्षणांचा सोक्षमोक्ष लागला;
माझं गेलेल्या क्षणांच गणित मांडणं;
अन् माझंनाईलाजाने का होईना;
तुला पूर्वीप्रमाणे सामोरं जाणं.