प्रेमाची फुलपाखरं उडून गेली मागे आठवणींचे रंग ठेवून
अहंकाराचा पक्षी जळून गेला सोबत
भांडणांच्या ठिणग्या कधीच विझल्या होत्या
थोडी धुगधुगी राहिली होती मात्र.
घरभर असलेला वावर तसाच आहे अजून
रेंगाळात मागे उरल्यासारखा.
बापाचं बापपण उड़ून गेलं देह थंड झाल्य़ावर
आणि माझ्यासोबत गळेकाढूंची झुंड़
प्रेतावरच्या सोन्याकडे डोळा असलेली.
- प्रणव