धरतीमाय

इथं
कोंदणं गगनाचं
थांबणं पवनाचं
झाकोळणं तपनाचं
घुसमट खगांची
तगमग जीवांची
स्तब्धता पानांची-
अगतिक घरती ॥

कुठंतरी दूरदूर
गर्जणं अन् वर्षणं
भीषण मेघांचं
नाचणं अन् लखलखणं
मस्तवाल बिजलीचं
करणं होळी
कांही जीवांची-
शहारणं धरतीचं ॥

इथं
आता धावणं गारव्याचं
संगतीनं पवनाच्या
अंगावर घामेजल्या
फुंकारणं सुखाचं
हिंदोळणं पानांचं
सुटका गगनाची
तेजाळणं सूर्याचं
रोमांचित घरती ...
माझी धरतीमाय !