सूडाग्नीच्या वाटेवर...

सूडाग्नीच्या वाटेवर.......
माझी गझल ऐकण्यास गर्दी लोटली होती
काही जागीच नव्हती, बाकी झोपली होती
वादंगाचा दुरावा पंक्तीत उरला नाही
डावी उपाशी नव्हती, उजवी जेवली होती
घामचोरीची तक्रार दाखल केली तेंव्हा
विरोधक प्रसन्न नव्हते, सत्ता कोपली होती
सूडाग्नीच्या वाटेवर गतीरोधक नसतात
सलवार विझली नव्हती, पगडी पेटली होती
नियतीचे सारे घाव निग्रहाने पेललेत
संधी दवडली नव्हती, अभये वेचली होती
गंगाधर मुटे
*********************