सरणावर माझ्या माझाच हात आहे,
हे गीत वेदनेचे मी आज गात आहे.
माझ्याच या हातांनी हा खेळ मांडीला मी,
हा डाव मोडलेला आता पाहात आहे.
मौनात काल माझ्या हुकुमी आवाज होता ,
मौनात आज माझ्या एक आर्त हाक आहे.
गात्रे गलित झाली थकल्यात जाणीवाही,
वेड्या मनास तरी का मोहाची साथ आहे.