भाषा : आग्री/मराठी
माझ्या केसावरून हात फिरवत ती म्हणाली,
बाला,
शेरबाजारांन आस्तास
तर म्होटा सायेब होला आस्तास
गावांन कोनला ना कदर
बुधीची अन मानूसकीची
आरं, लोक रास (भरपुर) बोलतांन
आता मानुसकी फकस्त गावांन
असा कायीच नस्तो रं बाला
मानुसकी ऱ्हाती मानसाच्या मनांन
मना तू 'बं ' बोतलास
ह्या डोकरीच्या पाया परलास
मना (मला) घरच्यांनी गोठ्यांन टकली
त्ये बोलतांन हीचीच पनोती लागली
मना अंगावर दुध न्हवता बाला,
कोंड्याचा दुध करून ही सात पोरा पोसली
मी भारी झाले रे बाला ह्यांना
बापुस मेल्यावर ह्यांनी माझा अंगठा झेतला
माझी सारी विस्टेट मीनी दिली साऱ्यांना
पन, पोरा सारी माझीच रे
का शिव्या देऊ त्यांना?
तु माझ्यान तुझी अस (आई) शोधतोस
म्हनून तर बाला, मना वाटला
तु ह्या गावांन कंला (कशाला) आला?
आरं,
आसल जर का माया तुझ्या नजरेंन
बघ दिसलं तुला प्रत्येक प्राण्यांन गाय
अन समद्या जगांन माय
डोकरी बोतली (म्हणाली)
जा, बाला, चंगला व्हईल तुझा
मना घरचा रस्ता हाये म्हाईत
पन त्ये मला घरात घेनार न्हाईत
म्या हीथच मरनार
म्या अता झालोच तिऱ्हाईत
तु निंग ईथशा (तू जा ईथून )
जा, लांब दुरदेशा,
ह्ये चोर तुझा पारतील फरशा
ही मानसं म्हनजे ऊंच वारलेली झारं
मोठ्या झाराखाली छोट्या रोपाच व्हईल मातेरं
जा बाला, नको थांबू
निंबरान (ऊन्हात) केस न्हाईत झालं माझ पांढर
फुकाट मरशील,
तुझ्यातल्या मानुसकीला आग लावायला
समदा गाव येईल
मी, गहिवरलो, बोललो
'बं ' असा नको बोलू
मी बी हीथच ऱ्हानार
माये, तुझ्या संगतीच ऱ्हानार
माझ्या मनान अजून आशा हाये
समदा अजून संपलेला नाय.