माणसाला माणुसकीचे दर्शन
घडविणे तसे अवघडच आहे
माणसांच्याच घरात आता
माणसांचीच पडझड आहे
तो आता मुळात माणूस म्हणून
कुठे थोडा तरी उरला आहे
उरला जरी एखाद्या कोपऱ्यात
तो ही स्वार्थात पक्का मुरलाय
एखादाच विरळा सापडतो
माणुसकीच्या सदऱ्यात कधी
उसवलेल्या अस्तनी शिवत
सध्या तो ही हरला आहे.