आबाद

प्रेरणा :  'बहर' यांची मनोगतावर पदार्पणात "नाबाद" खेळी.

मनोगतावर हा माझा पहिलाच प्रयत्न नाही. कृपया काही चुकल्यास टीकेचे दगड मारावेत.

रात्र होती.. नेहमीचा वाद होता
शांतता कसली, तुझा उच्छाद होता..

चोंदले होते तुझे की नाक माझे ?
एवढ्या साठीच का हा वाद होता?

केस होते, खोवलेले फूल होते..
शेपटा माझा कधी आपाद होता

लाच द्यावी लागली मज चुंबनाची
लाच देण्याचा मलाही नाद होता..

भूत हा खोड्या असावा पिंपळाचा
वारला होता तरी आबाद होता !