अर्थ अन अर्थ
====================
गोल गोल फिरवुनी येतो शोध जागी
या गा असण्याला मोल कवडीचे नाही
कण कण झिजुनी होते गत पोतेऱ्याची
दामाजीच्या साथी वीण जगी पत नाही
तोंडा तोंडा दोन हात माया मायबापाची
पावलांना दहादिशा जग जशी पंचक्रोशी
रोज रोज रोजंदारी या ऋणा अंत नाही
गरगर फिरणाऱ्या जीवा माथी छत नाही
धुगधुगी शेवटाची थंड विझल्या आकांक्षेची
उबदार मऊशार सारी थोरवी या पैक्याची
छन छन राहो हाती सदा वाहती गंगाजळी
अर्था वीण निरर्थकशा असण्या अर्थ नाही
गोल गोल फिरवुनी येतो शोध जागी
दामाजीच्या गाठी वीण जागी बात नाही
====================
स्वाती फडणीस............. १२-०६-२०१०