काहा सगळा खेळ होता योगायोगांचा,
येथ गळाभेट होती का या नात्यांची.
मी वळुनी शोधण्या गेले वाटांना या,
दाट किती खिन्नता होती माझ्या पायी.
थांबत जाता इथे मी नाईलाजाने,
वेळ उगाची ढळावी ही आता माझी.
येथ फुलाव्यात आता का रात्रराण्या,
हाय उगा वेचल्या होत्या जाताना मी.
बोलत गेले जगाच्या भाषा साऱ्या मी,
शोधलं सारेच काही बावऱ्या डोळ्यांनी.
वेढत जाता मला येथे भासांनी या,
येथ मला तू न भेटे वेड्या वाटांनी .